Big News : शिक्षक भरतीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेली स्थगिती उठवण्यात आली. त्यानंतर दोन टप्प्यांत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले,
अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली. आधार पडताळणी तसेच जिल्हानिहाय बिंदू नामावलीचे काम पूर्ण होताच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
![Big News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/07/ahmednagarlive24-Maharashtra-News-12.jpg)
शिक्षणमंत्री केसरकरांनी सांगितले की, ९१.४ टक्के विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ८० टक्के जागांची भरती होईल. तोपर्यंत ५० टक्के पदे भरण्यात येणार आहेत. ‘कायम’ शब्द वगळलेल्या पात्र अघोषित शाळा,
कनिष्ठ कॉलेजातील पात्र तुकड्यांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार अनुदानपात्र अघोषित शाळांना २० व यापूर्वी २० अथवा ४० टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्यात आला असून ६१ हजार शिक्षकांना मूळ प्रवाहात आणण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचा दावा केसरकर यांनी केला.