नेवासा : तहसीलदार रुपेश सुराणा यांच्या आजोबांचे काल निधन झाले. मात्र निधनाचे दु:ख पचवून अंत्यविधीला न जाता त्यांनी मोबाइलवरून आजोबांचे अखेरचे दर्शन घेतले व दु:ख बाजुला ठेवून त्यांनी त्यांच्या कामाला प्राधान्य दिले.
सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास तहसीलदार रुपेश सुराणा यांचे आजोबा राणू लाल सुराणा यांचे निधन झाले. ही दु:खद घटना समजताच ते भावनाविवश झाले.
काही वेळ घरी थांबून त्यांनी तहसील कार्यलयात येत संस्थात्मक क्वारंटाइन झालेल्या ४९ जणांच्या जेवणाचे नियोजन केले. त्यानंतर शहरात जाऊन थर्मल गनद्वारे करण्यात येणारे सर्वेक्षणाचे काम सुरू करून दिले
आणि दुपारी दीडच्या सुमारस त्यांनी पत्नीसह व्हीडीओ कॉलिंगद्वारे आजोबांचे अंत्यदर्शन घेतले. नेवासा येथे कोरोनाचा रुग्ण सापडल्याने खबरदारी म्हणून पोटतिडकीने सर्वांची काळजी घेत असल्याचे तहसीलदार सुराणा यांना सर्वांनी पाहिले आहे.
हाच प्राधान्यक्रम कायम ठेवून आजोबांच्या निधनाचे दु:ख असूनही स्वत:ला सावरत त्यांनी कामास प्राधान्य दिले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®