हजार किलो गोवंशाचे मांस घेवून निघालेला टेम्पो पोलिसांनी पकडला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- जनावरांच्या मांस तस्करीच्या घटनांना पुन्हा एकदा वेग आला आहे. कोरोनाच्या भीतीने गेले अनेक महिने या तस्करींना आळा बसला होता.

मात्र जिल्ह्यात पुन्हा एकदा या घटना घडू लागल्या आहेत. संगमनेर तालुक्यात शहर पोलिसांनी गोवंश जनावरांची कत्तल करुन अवैधमार्गे वाहतूक करणारा टेम्पो पकडला असून मुंबईतील दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी एक हजार किलो गोवंशाच्या मांसासह 4 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

रविवारी (ता.1) मध्यरात्रीच्या सुमारास संगमनेरातील साखळी कत्तलखान्यांमधून गोवंशाची मोठ्या प्रमाणात कत्तल करुन एका टेम्पोतून त्यांचे मांस मुंबईकडे नेले जात असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली.

त्यानुसार पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गावरील सायखिंडी फाटा येथे सापळा लावून संशयित वाहन पकडले. यावेळी वाहनाची तपासणी केली असता त्यात एक हजार किलो गोवंशाचे मांस असल्याचे पोलिसांना आढळले.

पोलिसांनी टेम्पोसह मांस ताब्यात घेत दोघांना अटक केली. या प्रकरणी पो.शि.धनंजय महाले यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आरोपी वाहनचालक शहनवाज मोहम्मद हुसेन (वय 20) व इसतीयक अहमद कुरेशी (वय 25, दोघेही रा.कुर्ला, मुंबई) या दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी गोवंशाचे मांस वाहतूक करणारा 3 लाख रुपये किंमतीचा आयशर कंपनीचा टेम्पो (क्र.एम.एच.03/सी.व्ही.7922) व 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे एक हजार किलो गोवंशाचे मांस असा एकूण 4 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe