मुख्यमंत्रीपदाबाबत ठाकरे यांनी लावला थेट मोदींना फोन ; काय झालं संभाषण

Ahmednagarlive24
Published:

महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा राजकीय पेच निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळाने दोन वेळेस राज्यपालांची भेट घेतली आहे. या प्रस्तावावर विचार करतो, अशी सूचक प्रतिक्रिया राज्यपालांनी दिल्याचं महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.

आता या पेचप्रसंगावर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोनाच्या संकटात राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे,

त्यामुळे तुम्हीच याच्यात लक्ष घाला, असं उद्धव ठाकरेंनी मोदींना सांगितल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त सदस्य करण्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळाने दुसरा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिला.

यासाठी महाविकासआघाडीचे नेते मंगळवारी राज्यपालांना जाऊन भेटले. या प्रस्तावावर विचार करतो, अशी सूचक प्रतिक्रिया दिल्याने यांच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना फोन करून याबाबत चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पंतप्रधानांच्या मध्यस्थीनंतर राज्यपाल याबाबत लवकर निर्णय घेतील, अशी अपेक्षा शिवसेना नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्रातमध्ये २६ मार्चला विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी मतदान होतं,

पण कोरोना व्हायरसमुळे या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. यानंतर ९ एप्रिलला मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त सदस्य करण्यासाठीचा प्रस्ताव राज्यपालांना पाठवण्यात आला.

पण हा प्रस्तावाची प्रक्रिया अयोग्य असल्याचं सांगण्यात आलं. अखेर महाविकासआघाडीने नवा प्रस्ताव राज्यपालांना दिला. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १७१ नुसार राज्यपालांना सदस्यांना नियुक्त करण्याचा अधिकार असतो. राज्यपाल नियुक्त सदस्य कला, साहित्य, विज्ञान किंवा समाजसेवा क्षेत्रात काम करणारी असावी लागते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment