नवी दिल्ली राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात रुग्ण संख्या 50 हजारांपार गेली आहे. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्याला प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सेस यांची चणचण भासू लागली आहे.
यासाठी राज्य सरकारने आता केरळ सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. कोरोनाशी यशस्वी लढा दिलेल्या डॉक्टर आणि नर्सेसना राज्यात पाठविण्याची विनंती राज्य सरकारतर्फे पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.
केरळमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात सरकार आणि यंत्रणेला आलेल्या यशानंतर, आता तोच प्रयोग महाराष्ट्रातही व्हावा, ही सरकारची इच्छा आहे. राज्यात आजही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलेल्या भाषणात संख्या वाढणार असल्याचे संकेत दिले होते. संख्या वाढणार असली तरी काळजीचं कारण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी केरळमध्ये कोरोनाशी मुकाबला करणारे हे डॉक्टर्स आणि नर्सेस उपयोगी ठरतील अशी सरकारला आशा आहे.
भविष्यात मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये रुग्णांची वाढती संख्या रोखण्याचा सर्वोतपरी प्रयत्न सध्या राज्य सरकारकडून सुरु आहे.