अहमदनगर :- नगर लोकसभेची जागा भाजप व राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच विखेंना येथून उमेदवारी दिली असल्याने त्यांचे विशेष लक्ष या मतदारसंघावर आहे.
दुसरीकडे पवार यांनी डॉ. विखेंना उमेदवारी नाकारताना आमदार संग्राम जगताप यांना उतरवून त्यांच्यासाठी आपलीही जिल्ह्यातील राजकीय ताकद एकवटली आहे.

त्यामुळे येत्या १५-२० दिवसात या मतदारसंघात दोन्ही बाजूंनी स्टार प्रचारकांच्या सभांचा धडाका दिसणार आहे.
मार्चच्या अखेरीस नगरमध्ये समर्थकांची बैठक घेऊन पवारांनी जगतापांना दिलासा दिला असताना आता सर्वात आधी त्यांच्याच दोन प्रचार सभा जिल्ह्यात घेतल्या जाणार आहेत.
येत्या शुक्रवारी (५ एप्रिल) सायंकाळी शेवगावला व शनिवारी (६ एप्रिल) कर्जतला त्यांच्या सभा होणार आहेत.
दरम्यान सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेण्याचे भाजपचे नियोजन एकीकडे सुरू असताना दुसरीकडे त्यांची ही सभा झाल्यानंतर लगेच मनसेचे प्रमुख राज ठाकरे संग्राम जगताप यांच्यासाठी सभा घेण्याची शक्यता आहे.
बदलत्या राजकारणात ठाकरे व पवार यांच्यात मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
त्यामुळेच त्याचे पुढचे पाऊल म्हणून मोदींविरोधात त्यांच्याच भाषेत आगपाखड करण्यासाठी राज ठाकरेंना पुढे केले जाणार असल्याचे सांगितले जाते.
या पार्श्वभूमीवर नगरला मोदींची सभा झाल्यावर लगेच राज ठाकरेंचीही सभा अपेक्षित मानली जात आहे.
मोदींची १३ एप्रिलला रामनवमीच्या दिवशी वा नंतर १५ ते १८ एप्रिलदरम्यान सभा घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे त्यानंतर राज ठाकरेही नगरला येण्याची शक्यता आहे.
- धक्कादायक सत्य ! 6 एअरबॅग्स असलेल्या गाड्या खरंच सुरक्षित आहेत का? उत्तर ऐकून थक्क व्हाल!
- Apple चा मोठा धमाका ! M4 चिप,15-इंच डिस्प्ले आणि 2TB स्टोरेजसह MacBook Air लाँच, किंमत फक्त ₹99,900!
- Samsung Galaxy Tab फक्त तीस हजारांत ! 8000mAh बॅटरी, 90Hz डिस्प्ले, आणि जबरदस्त प्रोसेसर
- Tata Punch Offer : भारतातील नंबर 1 SUV आता स्वस्तात घ्या, मार्च ऑफरची संधी सोडू नका!
- मातीच्या भांड्यांची क्रेझ पुन्हा वाढली ! मातीच्या भांड्यांचा व्यवसाय करा आणि 50 % पेक्षा जास्त नफा मिळवा!