अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ला सविस्तर मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला.
त्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेलं राजकीय नाट्य यावरही भाष्य केले. शिवसेनेआधी शरद पवार यांनी भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी चर्चा केली होती,
असा आरोप भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केला. यावर बोलताना पवार म्हणाले, सरकार स्थापनेबाबत भाजपशी कधीच चर्चा झाली नाही.
फडणवीस हे राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते. त्यांना काही माहीत नाही, असा ‘गौप्यस्फोट’ शरद पवार यांनी केला.
तसेच फडणवीसांच्या ‘हो, मी पुन्हा येईन…’ या वक्तव्यामुळे एक तर असं आहे की, कुठल्याही राज्यकर्त्याने, राजकीय नेत्याने मीच येणार ही भूमिका घेऊन जनतेला गृहीत धरायचं नसतं.
अशा गृहीत धरण्यात थोडासा दर्प आहे अशा प्रकारची भावना लोकांच्यात झाली आणि यांना धडा शिकवला पाहिजे हा विचार लोकांच्यात पसरला असेही पवार म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews