बाळ बोठेला आता विद्यापीठाचा दणका ! झाले ‘असे’ काही !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- पुणे विद्यापीठाने कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी चालू शैक्षणिक वर्षापासून राजकीय पत्रकारिता हा विषय सुरु केला होता.

या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी बोठे याच्या राजकीय पत्रकारिता या पुस्तकाची निवड करण्यात आली होती. रेखा जर हत्याकांड प्रकरणातील मुख्य सुत्रधार आरोपी बाळ बोठे याचे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतलेला आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

बाळासाहेब बोठेच्या ‘राजकारण आणि माध्यमं’ या पुस्तकाचा एम. ए. अभ्यासक्रमातील राज्यशास्त्र विषयात संदर्भग्रंथ म्हणून समावेश आहे. हेच पुस्तक यावर्षी कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या राजकीय पत्रकारिता विषयाच्या अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून निवडले गेले गेले होते. बाळ बोठे याची आतापर्यंत तब्बल 14 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

बाळासाहेब बोठे याच्या या पुस्तकांपैकी 6 पुस्तकांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे.

मुद्दे आणि गुद्दे, पक्ष आणि निष्पक्ष, कानोकानी-पानोपानी आणि नेतृत्व मीमांसा ही 4 पुस्तकं पुणे विद्यापीठाच्या कला शाखेच्या राज्यशास्त्र विषयासाठी संदर्भग्रंथ म्हणून निवडण्यात आली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment