स्वत:चं अपयश लपवण्यासाठीच भाजपाला लव्ह जिहाद सारख्या मुद्द्यांचा आधार घ्यावा लागतोय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- केंद्र सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यात पुर्णपणे अपयशी ठरलं आहे. भाजपशासित राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

आपलं हे अपयश लपविण्यासाठीच भाजपा धार्मिक कट्टरतेच राजकारण करत असल्याची घणाघाती टीका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शनिवारी पत्रकार परिषदे दरम्यान केली आहे.

अस्लम शेख पुढे म्हणाले की, दिवसागणिक हजारोंच्या संख्येने तरुण – तरुणी बेरोजगार होत आहेत. उद्योगधंदे बंद पडत चालले आहेत. लघु उद्योजकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. नेपाळ, बांग्लादेशसारखे देश आपल्या पुढे जाऊ लागले आहेत, या सर्व मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच भारतीय जनता पार्टीला कधी तिन तलाक,

लव्ह जिहाद तर कधी छठ पूजा व मंदिरं उघडण्यासारख्या मुद्द्यांचा आधार घ्यावा लागतो आहे. कुठलाही देश शेजारील देशांबरोबर शत्रूत्वाचे संबंध ठेऊन स्वत :ची प्रगती करुन घेऊ शकत नाही.

आज भारताचे शेजारील राष्ट्रांबरोबर संबंध विकोपास गेलेले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी स्व. अटलबिहारी वाजपेयींच्या विचारांचा अभ्यास करण्याची व त्यातून बोध घेण्याची गरज असल्याचा सल्ला मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपच्या नेत्यांना दिला.

अस्लम शेख यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पार्टीच्या राजकीय स्वार्थाने प्रेरीत आंदोलनांच्या दबावाखाली येऊन घाईघाईत कोणताही निर्णय महाविकास आघाडीचे सरकार घेणार नाही.

दिल्ली सरकारने केलेल्या चुका ह्या भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनांच्या मागण्या आहेत. दिल्लीमध्ये माॅल्स, मंदिरे, सिनेमागृह खोलण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र या निर्णयाचं पर्यावसान कोरोनाचे रुग्ण वाढण्यात झालं.

ह्या चुका महाविकास आघाडीचे सरकार करणार नाही. मुंबईत उभ्या राहिलेल्या कोरोना काळजी केंद्रांचं कौतूक भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (I.C.M.R) सारख्या संस्थेने केलं.

कोरोना विरोधातल्या धारावी पॅटर्नची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. येणाऱ्या काळात देखील ही कोरोना काळजी केंद्र चालू ठेवली जातील.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment