अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- बीड जिल्ह्यातील धूमेगावातील आंतरजातीय प्रेम प्रकऱणातून 25 वर्षीय तरुणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मुलीच्या प्रियकराला तिच्या आई-वडिलांनीच संपल्याचा धककादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. शेतात बोलावून प्रियकराला विष पाजलं. त्यानंतर उपचारादरम्यान, तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जिजाबा गंगाराम कुलाळ असं मयत तरुणांचं नाव असून जिजाबाचे आई-वडील ऊसतोडनीला कोल्हापूरला गेले असताना त्याला गावाकडे बोलावून मारहान करत विष पाजल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलाय.
मयताच्या अंगावर मारहान केल्याचे वळ असायची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. विष पाजल्यानंतर जिजाबा याला तात्काळ जिल्हा रुग्णांलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं अखेर त्याचा आज मृत्यू झाला आहे.
या संपूर्ण प्रकरणात पोलीस कसून तपास करत असून जिजाबाचा मृत्यू नेमका कसा झाला याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात पोलीस नातेवाईकांची शेजाऱ्यांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.