अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलून देऊन त्यांची क्रूर हत्या

Ahmednagarlive24
Published:

जळगाव :- जन्मदात्या पित्यानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलून देऊन त्यांची क्रूर हत्या केल्याची घटना येथे घडली असून, पित्याने स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी पित्याविरुद्ध पिंपळगाव (हरे.) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव (हरे.) ता. पाचोरा येथील रहिवासी असलेले विकास सुरेश ढाकरे (तेली)

हे दि. २२ रोजी सकाळी ७:३० वाजता आपल्या तनुश्री विकास ढाकरे (वय १२) व परी (शिवन्या) विकास ढाकरे (४) या दोन मुलींसह शेळ्यांना पाला घेण्यासाठी जवखेडा शिवारातील अरविंद केशवराव शिंदे यांच्या शेतात गेले होते.

अरविंद शिंदे यांच्या शेतात असलेल्या विहिरीजवळ आल्यानंतर विकास ढाकरे याने आपल्या तनुश्री व परी (शिवन्या) या दोन मुलींना विहिरीत ढकलून दिले.

त्यानंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलींना काय खाऊ घालू ? त्यांचे लग्न कसे होईल ? म्हणूनच ही टोकाची भूमिका घेतल्याची चर्चा होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment