त्या सराफांना लुटण्यासाठी सराफानेच दिली होती टीप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यातील दोघा सराफांना रस्त्यात अडवून त्यांच्या जवळील 60 लाखांचा मुद्देमाल लुटण्याची घटना घडली होती.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. मात्र या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे, कारण एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत घडलेली घटना अशी कि, माहिजळगाव येथील सोन्याचे दुकान बंद करून रविवारी (ता. 1) सायंकाळी सराफ व्यावसायिक अतुल चंद्रकांत पंडित (रा. मिरजगाव, कर्जत, अहमदनगर) कारमधून घरी जात होते.

बाभुळगाव खालसा शिवारात दुचाकीवर आलेल्या दोघांनी मोटारीची काच फोडून पंडित यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी भरलेल्या तीन बॅग हिसकावून घेतल्या,

अशी फिर्याद पंडित यांनी कर्जत पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवत या चोरट्यांच्या शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना केली.

अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून या प्रकणी पोलिसांनी सहा जणांच्या टोळीला पकडले आहे. या सहा जणांना पोलिसांकडून अटक अण्णासाहेब रामहरी गायकवाड (वय 28, रा. वाकड, पिंपरी चिंचवड),

संदेश महादेव डाडर (रा. लांगोर गल्ली, कर्जत), भारत नवनाथ साळवे (वय 24, रा. राशीन, ता कर्जत), गणेश चंद्रकांत माळवे (रा. रायकरमळा, येवत, जि. पुणे), अक्षय बाबूराव धनवे (रा. प्रेमदान हाडको, नगर) व राम जिजाबा साळवे (रा. राशीन, ता. कर्जत) अशी त्यांची नावे आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे यामधील आरोपी सराफ व्यावसायिक गणेश चंद्रकांत माळवे (रा. रायकरमळा, येवत, जि. पुणे) यानेच हा सर्व प्रकार घडवून आणल्याचेही तपासात समोर आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment