इंदोरीकर महाराज यांच्यावर दाखल झालेला गुन्हा तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

त्यामुळे इंदुरीकर समर्थक आता आक्रमक झाले आहे.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्यावर दाखल झालेला गुन्हा तातडीने मागे घ्यावा; अन्यथा वारकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा खडांबे येथील चंद्रकांत खळेकर महाराजांनी दिला.

नायब तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, समाजप्रबोधन हा गुन्हा असेल, तर वारकरी संप्रदायातील प्रत्येक महाराजावर गुन्हा दाखल करावा लागेल.

इंदोरीकर गेल्या २५ वर्षांपासून व्यसनमुक्ती, स्रीभ्रूणहत्या, पर्यावरणाचे संरक्षण, आई वडिलांची सेवा याबाबत ग्रंथातील पुरावे देऊन प्रबोधन करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment