अहमदनगर लाईव्ह 24 टीम / लोणी :- समाजामध्ये भगवान गौतम बौद्धांचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची बीजे रुजवून स्वतंत्रता, समता व बंधुता या त्रिसुत्रीचे आचारण केल्यास मनुष्य जिवणातील प्रगती साध्य करेल असा विश्वास बौद्धाचार्य संदीप त्रिभुवन यांनी केले.
लोणी बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नप्रयत्नातून नव्याने उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बौध्द महासभा अहमदनगर उत्तर विभागा अंतर्गत महिला उपासिका शिबीराच्या समारोपा प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना बौद्धाचार्य त्रिभुवन बोलत होते.
या १० दिवस चाललेल्या या परिसंवादात परिसरातील महीला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे अहमदनगर जिल्हा उत्तर शाखेचे अध्यक्ष संजय खंडीझोड, केंद्रीय शिक्षिका अरूणाताई पंडीत, तालुका अध्यक्ष नानासाहेब पंडित, बौद्धाचार्य निवृत्ती सोनवणे गुरुजी व मोगलराव बनसोडे यांच्यासह लोणी खु., लोहगाव, बाभळेश्वर व परिसरातील अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजामध्ये भगवान बुद्ध, धम्म आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची बीजे रुजवून त्यानुसार आचरण करण्यासाठी तसेच सर्वांच्या मनात स्वतंत्रता, समता व बंधुता निर्माण करण्यासाठी गेली १० दिवस हे महिला धम्म उपासिका शिबीर घेण्यात आले होते.
या शिबिरात रमा – सावित्री स्वाभिमानी महिला संघटनेच्या सर्व महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी महीलांनीही आपले मनोगत व्यक्त करत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहीली.