मुख्यमंत्र्यांनी काय लॉक आणि काय अनलॉक हे स्पष्ट करावं – फडणवीस

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते अमरावतीतील क्वारंटाईन सेंटरची पाहणी करत आहेत. यावेळी पत्रकारांशी बातचीत करताना त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं.

“भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचं कधीच समर्थन नाही. पण राष्ट्रवादीचे नेते यावर राजकारण करत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचे बोलत होते तेव्हा कुणीही त्यांना बोललं नाही”, असं यावेळी फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारने कर वाढवल्याने तीन रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोल दरवाढीवरुन काँग्रेसचं जे आंदोलन सुरु आहे ते बेगडी आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

राज्य सरकारने आपले कर कमी केल्यास पेट्रोलचे दर काही प्रमाणात कमी होतील, असं फडणवीस म्हणाले.अनलॉक 2 मध्ये गोंधळ आहे. मुख्यमंत्र्यांनी काय लॉक आणि काय अनलॉक हे स्पष्ट करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

कापूस खरेदीत सरकार अपयशी–कापूस खरेदीत राज्य सरकार अपयशी झाले. केंद्राने कापूस खरेदीचे पैसे दिले, पण राज्य सरकार वेळेत कापूस खरेदी करु शकले नाही. आजही शेतकऱ्यांकडे कापूस पडून आहे.

शेतकरी अडचणीत आहे.बोगस बियाण्यासामुळे शेतकरी अडचणीच आहे, यात कारवाई व्हावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी फडणवीसांनी केली.बोगस बियाण्यावर आळा घालण्यासाठी बियाणं कायद्यानुसार कंपन्यांकडून वसूल करावा.

वाढीव वीज बिलामुळे लोकं अडचणीत आली आहेत. हप्ते पाडून दिले असं दिसत नाही. केंद्र सरकारने राज्याला 90 हजार कोटीचं कर्ज दिलं आहे. त्यातून ग्राहकांना काही सूट मिळावी.

क्वारंटाईन सेंटरमध्ये समस्या क्वारंटाईन सेंटरमध्ये काही समस्या आहेत. अमरावतीमध्ये कोव्हिड हॉस्पिटलमध्ये पाण्याची समस्या आहे, जेवण नीट मिळत नाही. काही रुग्णांवर उपाशी राहण्याची वेळ येतेय.

अडचणी आणि समस्या सरकारपर्यंत पोहोचवणार असं त्यांनी सांगितलं.अमरावती आणि अकोला येथे रुग्ण वाढत आहेत. मृत्यूसंख्या जास्त आहे. रेट ऑफ इनफेक्शन जास्त असल्याने जास्त लोकांचं टेस्टिंग करणं गरजेचं आहे.

रॅपिड टेस्टिंग किट मागवल्या, असं विभागीय आयुक्तांनी सांगितले. कोरोनाच्या या काळात आपण क्रिटीकल स्टेजमध्ये आहोत. मुंबईत तीन दिवसांत 5100 टेस्टिंग केलं गेलं, ती वाढवणं गरजेचं आहे, असं फडणवीस म्हणाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment