अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्येला आठ दिवस उलटले असून या घटनेचा मास्टरमाइंड अद्याप फरार आहे. मात्र या हत्या प्रकरणातील इतर आरोपीना पोलिसांनी तात्काळ पकडले मात्र चतुर बाळ पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाला आहे.
या हत्याकांडामुळे नगर जिल्हा ढवळून निघाला आहे.कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी स्वीकारलेल्या पोलीस पथकाने कारनाम्या बाळाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना केली आहे रेखा जरे हत्याकांड घडवून आणणारा बाळ बोठे हा नाशिक मध्ये असल्याची कुणकुण पोलिसांना लागली.
या मिळालेल्या माहिती नुसार पिलसांनी नाशिक मध्ये त्या हॉटेलवर छापा मारला मात्र त्यापूर्वीच बाळ ने तेथून पलायन केलं होते. पोलीस पथकाला गुप्तबातमीदारांकडून बाळ बोठे नाशिक मध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पथक तातडीने नाशिकला रवाना झाले.
तो ज्या हॉटेल मध्ये असल्याची माहिती मिळाली होती त्या हॉटेलची पोलिसांनी कसून झाडाझडती घेतली. मात्र तेथून तो पसार झाल्याचे समोर आले.
या हॉटेलची अधिक माहिती सुरु असून त्यातून काही धागेदोरे मिळतात का हे पाहिले जात आहे. दरम्यान नव्याने जिल्ह्याचे सूत्र स्वीकारणाऱ्या पोलीस अधीक्षकांना बाळाचा शोध घेण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved