अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- एकीकडे शेतमालाचे दर दररोज कोसळत असल्याने शेतकरी कमालीचे अडचणीत आले आहेत. यात कुठेतरी कांद्याने त्यांना आधार दिला होता मात्र आता कांदा देखील वेगाने कोसळत आहे.
त्यामुळे शेतकरी आता पुरता परत एकदा आर्थिक संकटात सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे. १ नंबरचा लाल कांदा ४ हजार ५०० रूपये क्विंटल या दराने विकला जात हेाता.
मात्र गुरूवारी झालेल्याय लिलावात अवघ्या २ हजार ८०० रूपये दराने लाल कांदा विकला गेला. एकाच आडवड्यात लाल कांद्याच्या दरात तब्बल १५०० रूपयांची घट झाली आहे.
काही दिवसांपासून जिल्ह्यात गावरान कांद्याचे दर चांगलेच कोसळले होते. त्या तुलनेत यंदा प्रथमच लाल कांद्याला गावरान कांद्यापेक्षा अधिक दर मिळत आहेत. मात्र आता गावरान कांद्यापाठोपाठ लाल कांद्याचे देखील दर वेगात घसरत आहेत.
कांद्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण पाहून बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी झालेल्या लिलावात एक नंबरच्या गावरान कांद्याला २०००,
२ नंबर १७००, गोल्टी ८०० रूपये क्विंटल प्रमाणे भाव मिळाला. तर लाल कांद्याला १ नंबर २८०० रूपये, २ नंबर २३००, गोल्टी १४०० रूपये भाव मिळाला. पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांद्याच्या उत्पादनात मोठी घट येत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये