शेवगाव :- तालुक्यातील हिंगणगाव येथील प्रेमीयुगुुलाचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह गावातील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
दरम्यान त्यांनी आत्महत्या केली की घातपात झाला, याबाबत दोन्ही कुटुंबीयांकडून आरोप-प्रत्यारोप होत असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांना काहीही हालचाल करता आली नाही.
शवविच्छेदनही होऊ शकले नाही. हा प्रकार रविवारी रात्री विहीरमालक संपत मिसाळ यांच्या लक्षात आला. सोमवारी पोलिस व ग्रामस्थांनी क्रेनने दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.
मुलगी अल्पवयीन आहे. तिच्या आईने गुरुवारी (९ मे) मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती.
आपली १६ वर्षांची मुलगी शौचास जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती पुन्हा घरी आली नाही.
गावातील व बाहेरगावच्या नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती सापडली नाही, असे तक्रारीत म्हटले होते.
शेजारीच राहणारा राजेंद्र परमेश्वर शिंदे (वय २५) घरी नसल्याचे लक्षात आल्यावर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला.
दोन्ही मृतदेह कुजलेले असल्याने परिसरात मोठी दुर्गंधी सुटली होती. या घटनेबाबत दोन्ही कुटुंबीयांच्या वतीने एकमेकांवर आरोप करण्यात आले. घटनास्थळी तणावाचे वातावरण होते.
- नेप्ती उपबाजार समितीच्या ७ एकर जागेमधून मुरुम उत्खनन करणाऱ्या टोळीवर कारवाई करा – अमोल येवले
- महापालिकेने पाणीपट्टी दारात केलेली वाढ त्वरित रद्द करावी – आ.संग्राम जगताप
- पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ ठिकाणी तयार होणार तीन नवे उड्डाणपूल
- बिल देण्याच्या कारणावरून साकूरमध्ये हाणामारी ; १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, सकल हिंदू समाजाचे गावबंद आंदोलन
- ‘आध्यात्मिक शक्तीपीठ म्हणून भगवानगडाची ओळख’ ; भगवान गडावर भाविकांची अलोट गर्दी