सेल्फी घेण्याच्या नादात तरुणाचा पाय घसरुन मृत्यु

Published on -

राहुरी :- लोणावळा येथील हिल स्टेशनवर सेल्फी काढल्यानंतर पाय घसरून राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथील एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला.

ही घटना शनिवारी दुपारी घडली. रवींद्र काशीनाथ शेटे (वय २३) हा लोणी येथील नर्सिंग महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत होता.

शनिवारी पहाटे रवींद्र आपल्या काही मित्रांसह लोणावळ्याला फिरण्यासाठी गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास रवींद्र व त्याचे मित्र हिल स्टेशनवर गेले. तेथे त्यांनी सेल्फी घेतली.

त्यानंतर रवींद्रचा पाय घसरला. तो ५० फूट खाली कोसळला. त्याच्या डोक्यास जबर मार लागला. जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला.

मित्रांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर स्थानिक नागरिक मदतीस धावून आले. रवींद्रला एका रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केले.

रविवारी रवींद्रवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्रच्या मागे आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe