लासलगाव जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : नाशिक येथील लासलगाव बस स्थानकात पेट्रोल अंगावर पडून गंभीर भाजलेल्या पीडित महिलेचा मुंबईत उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला . गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेली पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर संपली.

भायखळा येथील मसिहा रुग्णालयात शुक्रवारी रात्री १२.३० वाजता पीडित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

मुंबईतील जे.जे.रुग्णालयात मृत पीडित महिलेचे शवविच्छेदन केले जाणार असून त्यानंतर तिला अंतिम संस्कारासाठी लासलगाव येथे आणले जाईल. महिलेच्या पार्थिवावर लासलगाव येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

१५ फेब्रुवारी रोजी लासलगाव बस स्थानकात आपसातील वादातून महिलेच्या अंगावर पेट्रोल पडून तिच्या कपड्यांनी पेट घेतला होता. यात सदर महिला ६७ टक्के भाजली होती.

नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात महिलेला दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात शनिवारी मध्यरात्री पुढील उपचारासाठी पोलीस बंदोबस्तात मुंबईला हलवण्यात आले होते.

पोलिसांनी संबंधित महिलेचा कथीत पती, त्याचे दोन साथीदार, पेट्रोल पंपाचा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांवर ज्वलनशील पदार्थाचा हयगयीने वापर केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment