‘त्या’महिला सरपंचाचे पद पुन्हा शाबूत जिल्हाधिकार्यांचा निर्णय विभागीय आयुक्ताकडून रद्द

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  नगर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या सारोळा कासार या ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाचे पद रद्द करण्याबाबत जिल्हाआधीकाऱ्यांनी दिलेला आदेश विभागीय आयुक्तांनी फेटाळला आहे.

सारोळा गावात सरपंचायांनी अतिक्रमण केल्याने त्यांचे पद रद्द व्हावे. म्हणून दाखल केलेल्या तक्रार अर्जावर विभागीय आयुक्तांनी हा आदेश दिल्याने नगर तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सारोळा कासार येथील सरपंच आरती कडूस यांचे गावात अतिक्रमण असल्याची तक्रार गावातील भाऊसाहेब कडूस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती.

त्याची तपासणी व सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ३ जुलै २०१९ रोजी त्यांचे सरपंच पद रद्द केले होते. आरती कडूस या भाजपच्या पंचायत समितीचे गटनेते रविंद्र कडूस यांच्या पत्नी आहेत

यामुळे नगर तालुक्यात या आदेशाने मोठी खळबळ उडाली होती.आरती कडूस यांच्या जागी जयप्रकाश पाटील यांची सरपंच म्हणून प्रशासनाने नियुक्ती केली होती.

मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला सरपंच आरती कडूस यांनी नाशिक विभागीय आयुक्ताकडे तक्रार देऊन याबाबत योग्य न्याय देण्याची विनंती केली.

यानुसार खालेल्या सुनावणीत नाशिक विभागीय आयिक्त कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी राजेंद्र देसले यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सरपंच पद रद्द करण्याचा आदेश देऊन,

त्यांचे सरपंच पद पुन्हा शाभूत ठेवले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने एक समिती गठीत करून याबाबत योग्य तापसणी करण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशाने सरपंच आरती कडूस या पुन्हा आता सरपंच पदावर विराजमान होणार असून यामुळे नगर तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment