अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : बेलापुरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर २०० मीटर परिसर पूर्ण सील करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिल्या.
तथापि, चार दिवस संपूर्ण गावच बंद ठेवण्याचा निर्णय कोरोना कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. रविवारी रात्री एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
रुग्ण आढळलेल्या परिसरात नागरिक ये-जा करत असल्याचे निदर्शनास आल्यावर परिसर पूर्णपणे सील करा, एकाही व्यक्तीस बाहेर पडू देऊ नका, परिसरातील सर्वांची आरोग्य तपासणी करा, गावात फवारणी करा, त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन करा,
अशा सूचना प्रशासनाने दिल्या. यावेळी कामगार तलाठी कैलास खाडे, पोलिस नाईक रामेश्वर ढोकणे, राशिनकर निखिल, तमनर पोपट उपस्थित होते. साडेचारशे कुटुंबांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून संपर्कात आलेल्या सात जणांना क्वारंटाइन करण्यात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews