उपमुख्यमंत्री म्हणतात… लोकांचा जीव वाचवणे हे सरकारचे आद्यकर्तव्य

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- सध्या राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना तिन्ही पक्षांचे सरकार असल्यामुळे कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

मात्र विकासकामांसोबत लोकांचं आरोग्य चांगल राहील पाहिजे, कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे लसीकरणाचे टप्पे ठरवण्यात आलेले आहेत.

लोकांचा जीव वाचवणे हे सरकारचे आद्यकर्तव्य असल्याचे मत उपमुख्मंत्री अजित पवार यांनी सांगितले. ना.पवार आज जिल्हा दौऱ्यावर आले होते.

श्रीगोंदा येथे ते म्हणाले नगर जिल्ह्याचा मंत्रीमंडळात कायम दबदबा राहिलेला आहे, जिल्ह्यातील तिन्ही मंत्री चांगले काम करत आहेत,जिल्ह्याने यावेळी विधानसभेत नवीन तरुण चेहेरे पाठवले आहेत त्यांना पूर्ण मनापासून साथ आम्ही देत आहोत.

आजमितीला शासकीय कर्मच्याऱ्यांचे पगार,पेन्शन यावर प्रति महिना १२ हजार कोटी रुपये खर्च होत आहेत. परंतु कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी निराशा पडत असल्याची खंत व्यक्त केली.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची उपेक्षा होत असल्याची टीका केली. शेतकरी जगला तर राज्य जगेल असे सांगून राज्य सरकारच्या तिजोरीत अपेक्षेपेक्षा १ लाख कोटी रुपये कमी जमा झाल्यामुळे राज्यावर आर्थिक संकट आहे

त्यामुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी वेगवेगळी व्यसने करणारे व कोरोनाच्या संकटात देखील मास्कचा वापर न करणाऱ्यांचा खास आपल्या शैलीत समाचार घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment