प्रेमीयुगुलाचा पावणेदोन वर्षांनंतर लागला शोध

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-गेवराई तालुक्यातील चकलांबा ठाणे हद्दीतून अपहरण झालेल्या एका मुलीसह तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पावणेदोन वर्षांनंतर ताब्यात घेतले.

बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गुरुवारी (दि. ३ डिसेंबर) मापेगाव (ता.परतूर, जि.जालना) येथे ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या दोघांनाही पुढील तपासकामी चकलांबा पोलिसांच्या स्वाधीन केले.

चकलांबा ठाणे हद्दीत गतवर्षी अपहरणाची घटना घडली होती. १३ मार्च २०१८ रोजी याप्रकरणी चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतरही संबंधिताचा शोध लागला नाही.

नंतर हे प्रकरण १ मार्च २०२० रोजी बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग झाले होते. पीडितेसह आरोपीचा या कक्षाकडून शोध सुरू करण्यात आला. ते दोघेही मापेगाव येथे असल्याची गुप्त माहिती अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळताच तिथे जाऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment