सरकारची संपूर्ण यंत्रणा आरक्षणाचा प्रश्न सोडण्यासाठी कामाला लागली !

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठीच आपण प्रामाणिकपणे सुरू केलेला लढा आता अंतिम टप्प्यात असून, आपल्या आरक्षणाची फाईल सरकारच्या टेबलवर असून, सरकारची संपूर्ण यंत्रणा आरक्षणाचा प्रश्न सोडण्यासाठी कामाला लागली असून,

मराठा समाज बांधवांनी एकजुटीने आरक्षणासाठी लढा द्यावा, कोणीही आरक्षणासाठी आत्महत्या करू नयेत, त्याचबरोबर आंदोलन देखील तीव्र स्वरूपाचे करू नये, सरकारला आरक्षण देण्यास निश्चितपणे भाग पाडू, त्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि पाठबळ महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले.

करंजी, ता. पाथर्डी येथे जरांगे पाटील यांचे शनिवारी रात्री साडेदहा वाजता आगमन झाले, त्यावेळी त्यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने तरुण वर्ग उपस्थित होता.

जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढो, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या वेळी करंजी येथील मुलींनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले.

करंजीसह, दगडवाडी, भोसे, वैजूबाभळगाव, सातवड, लोहसर, खांडगाव, कान्होबावाडी येथील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने जरांगे पाटील यांच्या स्वागताला उपस्थित होते. रात्री उशिरा झालेल्या जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी महिला भगिनीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe