अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाचपैकी एकाही जागेवर भाजपला वर्चस्व मिळवता आलं नाही.
दरम्यान, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली अशा शब्दांच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
अहम्-पणाचा पराभव झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही. पुणे आणि नागपूरसारखा परंपरागत मतदारसंघ भाजपच्या हातून गेला. लोकांचा आता भारतीय जनता पार्टीवरील विश्वास कमी होत चालला आहे आणि महाविकास आघाडीवर विश्वास वाढला आहे’
अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नेहमी म्हणतात, कोणी बाहेर गेल्यावर फरक पडत नाही, आम्ही हिमालयात जाऊन बसू, यांच्या नुसत्या गप्पा असतात, असं म्हणत खडसेंनी चंद्रकांत पाटलांनाही टोला लगावला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved