अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-विकासात्मक कामे असो व राजकीय मुद्दा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच शाब्दिक चकमक उडत असते.
नुकतेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शाब्दिक टोला लगावला आहे. मुंबईतील मेट्रोच्या कामावरून थोरात यांनी फडणवीस यांच्यावर ट्विटरच्या माथ्यमातून निशाना साधला.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई मेट्रोची फार चिंता आहे. मात्र त्यांनी मेट्रोच्या कामात अडथळे आणले नाहीत, सहकार्य केले तर ते ही मुंबई मेट्रोने विमानतळावर पोहचतील आणि वेळेत नागपूरचे विमान पकडू शकतील,
असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला. मुंबई येथील मेट्रोच्या कामावर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधीपक्ष भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू आहे. मेट्रो कारशेडवरून देखील मोठ्या प्रमाणात वाद झाला होता.
भाजपकडून मेट्रोच्या कामात अडथळा आणला जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून सतत करण्यात येतो. तर भाजपही याला प्रत्युत्तर देते. हाच धागा पकडून थोरात यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved