सोन्या-चांदीची चमक वाढली; असे आहेत दर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- दिल्ली सराफा बाजारात 5 जानेवारी 2021 ला सोन्याच्या भावात 335 रुपये प्रति 10 ग्रॅमची उसळी नोंदली गेली. तर, चांदीच्या दरात आज 382 रुपयांची किंचित वाढ झाली.

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचा भाव 335 रुपयांनी वाढून 50,969 रुपयांवर आला.

मागील व्यापार सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅम 50,634 रुपयांवर बंद झाला होता. जाणून घ्या सोन्याचा नवा दर – दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव 335 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा भाव आता 50,969 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

या अगोदरच्या व्यवहाराच्या सत्रात सोन्याचा भाव 50,634 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव आज आणि कालचा स्तर 1,942 डॉलर प्रति औंस वरच राहीला. जाणून घ्या चांदीचा नवा दर – चांदीत मंगळवारी तेजी नोंदली गेली.

दिल्ली सराफा बाजारात आज चांदीच्या किंमतीत अवघी 382 रुपये प्रति किलोग्रॅमची वाढ नोंदली गेली आहे. आता तिचा दर 69,693 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा भाव 27.30 डॉलर प्रति औंसवर बंद झाला. काल सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव हाच होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment