अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :सीमेवर तणाव असताना अनेक चिनी कंपन्यांनी पंतप्रधान केअर फंडाला कोट्यवधींचा निधी दिला. पंतप्रधान मोदी आणि चीनचे नेमके काय साटेलोटे आहे, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, मोदी अहमदाबादमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांच्याबरोबर चहा पीत होते, त्यावेळी चीनने पाँईंट ३० आर पोस्ट चुमार, लडाखमध्ये अतिक्रमण करायला सुरुवात केली होती. चीन सीमेवर आपले २० जवान शहीद होऊनही मोदी सरकार मात्र अजूनही आपल्या भ्रामक विश्वातून बाहेर यायला तयार नाही.
चीनने कधीही भारतीय हद्दीत घुसखोरी केली नाही किंवा कोणताही प्रदेश ताब्यात घेतला नाही असा दावा करून मोदी देशाची दिशाभूल करून चीनला पोषक भाषा बोलत आहेत, हे सर्वात घातक आहे.
राहुल गांधी यांनी याबाबत सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला, पण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले गेले. चीनने भारताच्या चार भागांत घुसखोरी करुन जमीन बळकावण्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले, तेव्हा सरकार व भाजपने या विषयांना बगल देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
जबाबदार विरोधी पक्ष म्हणून देशाचे हित लक्षात घेऊन काँग्रेस हे प्रश्न वारंवार उपस्थित करेल. मोदी यांची चीनशी विशेष जवळीक आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी चारवेळा चीनला भेटी दिली.
पंतप्रधान झाल्यानंतर सहा वर्षात पाचवेळा चीनला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांत चिंताजनक व गंभीर बाब म्हणजे मोदींनी चिनी कंपन्यांकडून पीएम केअर फंडासाठी घेतलेल्या देणग्या.
या फंडाची कार्यात्मक चौकट काय आहे? घटनेच्या कोणत्या कलमात हा फंड येतो याची कोणालाही माहिती नाही. यात जमा झालेल्या पैशांचे काय केले जाते, याबाबत कोणालाही माहिती नाही.
काँग्रेसचे सरकारला प्रश्न
१) २०१३ मध्ये चीनने सीमेवर कुरापती केल्या असतानाही मोदी यांनी चीनच्या कंपन्यांकडून निधी का घेतला? २) HUAWEI कडून पंतप्रधानांनी ७ कोटी घेतले का? या कंपनीचे चीनचे लष्कर पीपल्स लिबरेशन आर्मीशी संबंध आहेत का? ३) TIKTOK ने पीएम केअर फंडात ३० कोटींची देणगी दिला का? ४) पेटीएमने १०० कोटी दिले आहेत का? ५) XIAOMIने १५ कोटी दिले आहेत का? मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेरात सवाल
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews