राज्यपालांची मिश्किल टिप्पणी; दादांनी दिले `हे` उत्तर

Published on -

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- आज पुणे येथील विधान भवनाच्या प्रांगणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कोश्यारी यांच्यात काही वेळ भेट झाली.

भगतसिंह कोश्यारी हे कसलेले राजकारणी आहेत. यावेळी त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. त्यानंतर दादांनीही हसून प्रतिसाद दिल्याने जोरदार चर्चा सुरु आहे.

राज्यपाल कोश्यारी हे सकाळी ध्वजारोहणासाठी पोहोचले तेव्हा अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. ‘तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या राज्यात आलो आहे’

(आपकी परमिशन लिए बगैर आपके राज्य मे आय है…) अशी मिश्किल टिप्पणी राज्यपाल कोश्यारी यांनी केली. त्यावर अजित पवार यांनीही हसून ‘अरे ऐसा कुछ नही’ असं म्हणत राज्यपालांना प्रतिसाद दिला.

पुण्यातील ध्वजारोहण सोहळ्याचा व्हिडिओ पुणे विभागीय माहिती कार्यालयानं ट्विटरवर शेअर केला आहे. त्यातच राज्यपाल व अजित पवार यांच्यातील हे काही सेकंदांचं संभाषण ऐकायला मिळत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नेता किती ताकदीचा आहे आणि त्यांचं कार्यक्षेत्र, प्रभावक्षेत्र कोणतं आहे, याची उत्तम माहिती कोश्यारी यांना आहे. त्याच अनुषंगानं त्यांनी ही मिश्किल टिप्पणी केल्याचं बोललं जातं.

त्यांनी उत्तराखंडचं मुख्यमंत्रीपदही भूषवलं आहे. देशातील राजकारणाचीही त्यांना चांगली जाण आहे. अजित पवार यांच्या कामाची आणि स्पष्ट बोलण्याची शैली सर्वश्रुत आहे.

त्यांनी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना अशा वेगवेगळ्या पक्षासोबत उपमुख्यमंत्रीपद भूषविले आहे. दादांचा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच दबदबा राहिला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News