शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी अतिवृष्टीग्रस्तांसाठी इतक्या कोटींचा निधी

Ahmednagarlive24
Published:
मुंबई : राज्यात ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने आकस्मिकता निधीतून साडेचार हजार कोटी रुपये वितरीत केले आहेत.
तसेच जुलैनंतर अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा बसलेल्या बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी ३८९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सरकारी मदत संबंधितांच्या थेट बँक खा त्यात जमा होणार आहे.
या पैशांतून कोणतीही वसुली करू नये, असे आदेश सरकारने दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत महाराष्ट्र आकस्मिकता निधीत तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
ही वाढ ५ हजार ३५० कोटी रुपयांपर्यंत करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने शुक्रवारी शेतकरी, तसेच पूरग्रस्तांच्या मदतीबाबत दोन स्वतंत्र आदेश जारी केले. त्यानुसार शेतपिके आणि बहुवार्षिक फळपिकांच्या बाबतीत ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी ही मदत दिली जाईल.
शेतीपिकासाठी किमान मदत ही एक हजार रुपये आणि फळपिकांसाठी दोन हजार रुपये असावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. ही मदत दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत असणार आहे. ‘क्यार’ चक्रीवादळाने निर्माण झालेल्या अवकाळी पावसाचा फटका राज्यातील ३४९ तालुक्यांतील शेतकऱ्यांना बसला होता.
पंचनाम्यानंतर सुमारे ९३ लाख हेक्टर क्षेत्रांवरील शेतपिके तसेच फळबागांचे नुकसान झाल्याचे समोर आले होते. राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १६ नोव्हेंबरला शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली होती
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment