बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली आणि ….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथील आश्वी-निमगावजाळी रस्त्यावर मंगळवारी रात्री बिबट्याने युवकावर हल्ला केला. सादिक फकिरमंहम्मद शेख (२३, माळेवाडी) असे जखमी युवकाचे नाव आहे.

मध्यरात्री १ वाजता सादिक शेख चुलते अहमद शेख यांना सोडवण्यासाठी निमगावजाळीला दुचाकीवरून जात होता. आश्वी-निमगावजाळी रस्त्यावर चतुरे वस्तीलगत अंधारात बिबट्याचे बछडे त्याला दिसले.

ते थांबले असता बछडे निघून गेले. दोघांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता मादी बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली. दोघे खाली कोसळले.

बिबट्याने सादिकला चावा घेतला. दोघांनी आरडाओरडा केल्यामुळे मादी बिबट्या निघून गेली. बछड्याला छेडल्यामुळे हल्ला झाला असा अंदाज वनविभागाने वर्तवला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment