अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- तालुक्यातील नागरगोजे येथील सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांच्या गोळ्या घालून खून प्रकरणातील फरार आरोपी २४ तासाच्या आत जिल्हा गुन्हे शाखेचे दिलीप पवार यांच्या पथकाने पकडले असून तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मयत संजय बाबासाहेब दहिफळे हे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी होऊन गावचे सरपंच झाले. त्यांची प्रतिष्ठा वाढू लागली. या गोष्टीचा मनात आकस धरून व निवडणुकीत झालेल्या पराभवाचा राग धरून गावातीलच भावकितील १० आरोपींनी लाठ्या, चाकू, दगड, कुन्हाड व बंदुकीने त्यांचा खून केला.
यात सरपंच संजय दहिफळे जागीच ठार झाले तर ज्ञानेश्वर अशोक दहिफळे, रा. दैत्यनांदूर हा तरुण जबर जखमी असून त्याच्यावर मॅक्सकेअर हॉस्पिटल, नगर येथे उपचार सुरू आहेत.
काल या प्रकरणी गणेश रमेश दहिफळे, रा. दैत्यनांदूर, ता. पाथर्डी या तरुणाच्या फिर्यादीवरुन मारहाण करणारे आरोपी शहादेव पांडुरंग दहिफळे, विष्णू पंढरीनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर विष्णू दहिफळे, द्वारका भागवत नागरगोजे, विष्णूची पत्नी, मेजरची पत्नी नाव माहीत नाही,
मेजरची दोन मुले ज्ञानेश्वर विष्णू दहिफळे यांची पत्नी, मेजरचे वडील पंढरीनाथ, अनिकेत भागवत नागरगोजे, सर्व रा. दैत्यनांदर, ता. पाथर्डी यांच्याविरुद्ध पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक पाटील, डिवायएसपी जावळे, पोनि रत्नपारखी यांनी भेट दिली.
या आरोपीपकी तीन आरोपींना काल गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. पोनि रत्नपारखी हे पुढील तपास करीत आहेत. यातील एक आरोपी मेजर असल्याने त्यानेच गोळ्या झाडल्या असेही सांगितले जाते.