पाथर्डी |धक्कादायक व अनपेक्षित बातमीने पाथर्डी तालुका झोपेतून जागा झाला. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार यांच्या शपथविधीने सर्वांनाच चकीत केले.
आमदार मोनिका राजळे यांनाही शपथविधीबाबत काहीच कल्पना नव्हती. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मात्र नेत्यांचा कल पाहून प्रतिक्रिया व्यक्त करणे पसंत केले.
‘मी पुन्हा येणार’ अशी ग्वाही देणाऱ्या फडणवीस यांनी आपला शब्द खरा करून दाखवला आहे. विश्वासदर्शक ठराव निश्चित संमत होऊन राज्यात स्थिर सरकार येईल, असे भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर म्हणाले.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांबरोबर आहेत. भाजपबरोबर युती केल्यास जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल. विश्वासदर्शक ठराव बारगळणार असून राष्ट्रवादी, काँग्रेस व सेनेचे सरकार सत्तेवर येईल.
सेनेला दिलेला शब्द पक्षाने पाळावा. लोकांना भाजप व फडणवीस नको आहेत. पक्षाने लोकभावनेचा आदर करावा, असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे यांनी सांगितले.