अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौकातील ७० वर्षीय पुरुष व कुरण येथील ६३ वर्षीय महिलेचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. यामुळे बाधितांचा आकडा ११३ झाला आहे.
बाधितांपैकी मूळ रहिवासी ९८ आहेत. तालुक्याबाहेरील १५ रुग्ण असून ९२ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. १० रुग्ण अॅक्टिव्ह असून ११ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/06/corona-ahmednagar-news.jpg)
तालुक्यातील बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाड्या-वस्त्यांवर कोरोना पोहोचला आहे. अनेक गावे क्वारंटाइन केली जात आहेत. नागरिकही स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवत आहेत. प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews