जनता आता फार काळ या सरकारला खुर्चीवर बसू देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-कोरोना टाळेबंदीच्या काळात उत्पन्नाचे स्त्रोत बंद पडल्यामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडली होती.

अशा परिस्थितीत राज्यातील आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे सर्वसामान्य कष्टकरी जनतेला अर्थसहाय्य करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता वाढीव वीज बिले पाठवली.

नंतर सवलत देऊ असे सांगितले आणि आता जनतेचा विश्वासघात करत पूर्ण बील भरावे लागेल कोणतीही सवलत मिळणार नाही अशी भूमिका घेतली.

तसेच सत्ताधुंद सरकारला जाग आणण्यासाठी आज भाजपाच्यावतीने राज्यभर वीज बीलाची होळी करुन आंदोलन करण्यात येत आहे. महावितरणने टाळेबंदीच्या काळात राज्यातील जनतेला चुकीची व भरमसाठ बिले पाठविली होती.

या बिलांबाबत नागरिकांना सवलत देण्याचे शासनाने जाहिर देखील केले होते. मात्र आता या वाढीव बीलाबाबत सरकारने यु टर्न घेत जनतेचा विश्वासघात केला आहे, तसेच जनता आता फार काळ या सरकारला खुर्चीवर बसू देणार नाही,

असल्याची टीका माजी मंत्री व भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांनी केली. नगर बाजार समिती येथे भाजपाच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात वीज बीलांची होळी करुन आंदोलन करण्यात आले.

यावेळी आ बबनराव पाचपुते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री अरुण मुंढे, अक्षय कर्डिले, सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, मनोज कोकाटे, दिलीप भालसिंग, विलास शिंदे, बाळासाहेब महाडीक,

रमेश पिंपळे, रेवणन्नाथ चोभे, बबन आव्हाड, गिताराम नरवडे, सुमित कोठुळे, देविदास आव्हाड, सुरेश सुंबे, शुभम भांबरे, मधुकर मगर आदींसह भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment