शिर्डी विमानतळावर विमान घसरले

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी :- दिल्ली ते शिर्डी हे स्पाइस जेट बोइंग विमान शिर्डी येथील साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावर लँड झाल्यानंतर टर्मिनल पार्किंगकडे वळवत असताना धावपट्टी सोडून सुमारे पस्तीस ते साठ फूट विमान माती व खडी असलेल्या जमिनीत जाऊन रुतले.

या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी विमानातील १८९ प्रवासी बालंबाल बचावले आहेत. सुमारे साडेतीन तासांनंतर विमानातील प्रवाशांना विमानाच्या मागच्या दरवाजाने बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, सोमवारी संध्याकाळी शिर्डीत लॅडँग होणारे हैदराबाद व दिल्ली या विमानांचे लँडिग रद्द करण्यात आले. मंगळवारपासून शिर्डीतील विमानसेवा सुरळीत सुरू होणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली.

सोमवारी दिल्लीहून शिर्डीला सुमारे १८९ प्रवासी घेऊन स्पाइसजेटचे विमान साडेचारच्या सुमारास शिर्डी विमानतळावर लँड झाले. विमान लँड झाल्यानंतर धावपट्टीवरून एअर पार्कींगच्या दिशेने विमान जात असतानाच वैमानिकाला वेगावर नियंत्रण आणता आले नाही.

त्यामुळे विमान धावपट्टीसोडून थेट बाजूला ३५ ते ४० फूट जमिनीवर जाऊन फसले. या प्रकाराची चौकशी सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment