अहमदनगर :जिल्ह्यातील कोपर्डी शाळकरी मुलीवर बलात्कार व हत्येचा खटला औरंगाबाद खंडपीठाकडून मुंबई उच्च न्यायालयात नुकताच वर्ग झाला असून आता हा खटला मुंबईत चालणार आहे.
या बलात्कार व खूनप्रकरणात नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जितेंद्र बाबूलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ, नितीन गोपीनाथ भैलुमे या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
२९ नोव्हेंबर २०१७ रोजी नगरच्या न्यायालयाने हा निकाल दिला होता. या शिक्षेविरुद्ध तीनही आरोपींनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले आहे.
जिल्हा न्यायालयात खटला चालविताना आरोपींच्या वकिलांना पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. तसेच धमक्यांचे फोन आले होते. त्यामुळे हा खटला औरंगाबाद खंडपीठातून मुंबई वर्ग करावा,
असा अर्ज आरोपींच्या वकिलांनी मुख्य न्यायाधीशांकडे गेल्या महिन्यात केला होता. हा अर्ज मंजूर करून हा खटला मुंबईला वर्ग करण्यात येणार आहे.