राज्याने ओलांडला १ कोटी चाचण्यांचा टप्पा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-राज्यात आज ६९४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज राज्याने १ कोटी चाचण्यांचा टप्पा ओलांडला. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ४२ हजार ९१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.८९ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आज राज्यात ५,६४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

सध्या राज्याचा मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३५ हजार ६६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ६८ हजार ६९५ (१७.६२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ०९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन ७८ हजार २७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment