कोरोनाविरुद्ध उपाययोजना राबविण्यात राज्य कमी पडतंय; वाचा काय म्हणाले फडणवीस

Ahmednagarlive24
Published:

मुंबई/प्रतिनिधी कोरोनाचे खूप मोठे संकट राज्यासमोर उभे ठाकले आहे. परंतु या संकटाचा सामना करण्यात सरकार कमी पडत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कोरोनासंदर्भातील उपाययोजनांबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट होत आहे.

शेतमाल घरीच पडून आहे. खरेदीसाठी राज्य सरकारने व्यवस्था केलेली नाही. खरेदीचे पैसे केंद्र सरकार देतं, खरेदी राज्य सरकारला करावी लागते. त्याचीही व्यवस्था अद्याप झालेली नाही.

त्याचप्रमाणे युवकांसमोर बेरोजगारीचे संकट आहे. त्यामुळे यावरही राज्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्याप्रकारे केंद्र सरकारने पॅकेज दिलं तसं पॅकेज राज्य सरकारने द्यावं. महाराष्ट्राचं एकमेव सरकार आहे, ज्याने पॅकेज दिलेलं नाही.

त्याचप्रमाणे त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांवरही निशाणा साधला. शरद पवार पंतप्रधान मोदींना पत्र लिहितात आणि मदत करा अशी मागणी करतात. तसेच त्यांनी एखादं पत्र उद्धव ठाकरे यांनाही लिहिलं पाहिजे.

कारण राज्य सरकारच्या वतीने कोणतीही मदत करण्याचा विचार इथे दिसत नाही. फडणवीस पुढे म्हणाले की, “खरंतर कातडी बचाव धोरण राज्य सरकारच्या वतीने सुरु आहे.

त्यामुळे आपली आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे अडचणीत आली आहे. या विविध मुद्द्यांवर आम्ही एक निवेदन राज्यपालांना दिलं आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही. जनतेच्या वेदना मांडल्या नाही तर त्यांना न्याय मिळेल असं वाटत नाही.

त्यामुळे जनतेच्या वेदना मांडण्यासाठी ‘महाराष्ट्र बचाओ’ अशाप्रकारची भूमिका आमची आहे. या भूमिकेतून आम्ही टप्प्याटप्प्याने राज्य सरकारला जागं करण्याचं काम करणार आहोत.” …तर मग आम्ही सरकार सोबत आम्ही सरकारला मदत करायला तयार आहोत.

सरकारने आमची मदत घ्यावी. कठोर निर्णय घ्यायचे असतील तर आम्ही मागे उभे राहू. मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठकच दोन महिन्यांनी विरोधी पक्षांसोबत बैठक घेतली.

आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. ही बैठक म्हणजे नुसती औपचारिक्त असू नये. त्यातून तोडगा निघायला पाहिजे असं फडणवीस म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment