एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मोठे यश! पगारात करण्यात आली सरसकट 6500 रुपयांची वाढ आणि मिळाल्या ‘या’ गोष्टी

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला मोठे यश आले असून कर्मचाऱ्यांचे पगारवाढी संदर्भातली जी काही महत्त्वाची मागणी होती ती सरकारने मान्य केली व आता एसटी कर्मचाऱ्यांना पगारामध्ये सरसकट साडेसहा हजार रुपयांची वाढ होणार आहे.

Published on -

ऐन सणासुदीच्या कालावधीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून संप पुकारण्यात आला होता व यामुळे संपूर्ण राज्यातील एसटी सेवा कोलमडल्याने चाकरमान्यांचे आणि प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागले होते. संपाच्या माध्यमातून पगार वाढ ही एक महत्त्वाची मागणी एसटी कर्मचाऱ्यांची होती व त्याकरिता प्रामुख्याने हा संप करण्यात येत होता.

या संपावर तोडगा काढण्यासाठी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच मागण्या मान्य करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असून त्यामुळे आता प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे.

 एसटी कर्मचाऱ्यांना पगारात मिळाली सरसकट साडेसहा हजार रुपयांची वाढ

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला मोठे यश आले असून कर्मचाऱ्यांचे पगारवाढी संदर्भातली जी काही महत्त्वाची मागणी होती ती सरकारने मान्य केली व आता एसटी कर्मचाऱ्यांना पगारामध्ये सरसकट साडेसहा हजार रुपयांची वाढ होणार आहे. पगारवाढीचा लाभ पुढील महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना मिळणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत पगार वाढीसोबत इतर मागण्या देखील मान्य करण्यात आलेल्या आहेत.

 कशा पद्धतीने मिळेल ही पगारवाढ?

जर आपण नोव्हेंबर 2021 च्या अनुषंगाने बघितले तर एसटी कर्मचाऱ्यांना 2500, 4000 आणि 5000 अशी पगारवाढ देण्यात आलेली होती व त्यानुसारच आता कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाणार आहे. सरसकट साडेसहा हजार रुपयांची पगार वाढ सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात करण्यात आली असली तरी देखील ती मागील पगार वाढीनुसार मिळणार आहे.

सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये पाच हजार रुपयांची पगारवाढ मिळाली होती त्यांना आता 1500 रुपये पगारवाढ मिळणार आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना चार हजार रुपये वाढ मिळाली होती त्यांना 2500 रुपये पगारात वाढ होणार आहे.तर ज्या कर्मचाऱ्यांना 2500 रुपये वाढ मिळाली होती अशा कर्मचाऱ्यांच्या पगारात चार हजार रुपये वाढ होणार आहे.

 पगारवाढी शिवाय मान्य केल्या या मागण्या

सरसकट साडेसहा हजार रुपयांच्या पगारवाढीशिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या पुढील मागण्या देखील मान्य करण्यात आले आहेत…..

1- एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना वर्षभराचा मोफत पास दिला जाणार आहे.

2- तसेच एसटी कर्मचाऱ्यांची कॅशलेस मेडिकल विम्याची मागणी देखील मान्य करण्यात आली आहे.

3- तसेच दोन वर्षांपासून जे एसटी कर्मचारी निलंबित होते त्यांना देखील पुन्हा कामावर घेण्यात येणार आहे.

4- एवढेच नाहीतर राज्यातील 193 एसटी डेपोचा नुतनीकरणाचा प्रस्ताव देखील मान्य करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe