अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत असताना त्याचबरोबरीने शहरातील वाढती गुन्हेगारीला आवर घालण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच श्रीरामपूर येथील एका बॅक ग्राहक सेवा केंद्र चालकास तीन चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी संजय साखरे (वय 30. रा. धनगरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, साखरे आपल्या दुचाकीवर धनगरवाडीकडे जात असताना चितळी-धनगरवाडी रस्त्यावरील रेल्वे भुयारी पुलाखाली दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडवले.
व त्यांच्याजवळील 35 हजार रुपयांसह एक मोबाईल फोन लुटला. व चोरटे पसार झाले. दरम्यान साखरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तिघा चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका पोलिस पथक पसार चोरट्यांचा शोध घेत आहे, तरी या घडलेल्या रस्ता लुटीच्या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved