अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोरोनाचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आदर्श मागणी होत आहे.
पण, सरपंचपदासाठी कोट्यवधींचे लिलाव होत आहे. या पद्धतीवर राज्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्षेप घेतला आहे.
ज्या ग्रामपंचायती जाहीर लिलाव करून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत असतील तर त्याबाबत निवडणूक आयोगानं गुन्हे दाखल करावं, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली आहे.
मुश्रीफ म्हणाले, ही पद्धत लोकशाहीला घातक अत्यंत घातक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याबाबत आपण राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या 30 नामनिर्देशन पत्र सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यात सर्व्हर जाम झाल्यानं जात पडताळणी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
मात्र, असं असताना राज्यात सरपंचपदासाठी तब्बल 2 कोटींची बोली लागल्याचा प्रकार समोर आले आहेत. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केला आहे. लिलाव करून सरपंचाची बिनविरोध निवड करणे,
ही पद्धत लोकशाहीसाठी घातक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी आपण राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून तक्रार करणार असल्याचंही हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved