अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : ट्रीपल एक्स सिझन- 2 वेब सिरीजच्या माध्यमातुन भारतीय सैनिकांच्या घरातील महिलांच्या चारित्र्यावर संशय घेणार्या व लष्कराच्या वर्दीची विटंबनेची फिल्म निर्माण करुन समाजात विकृत संदेश पसरविणार्या फिल्म निर्माती एकता कपूर व या वेब सिरीजच्या संबंधीतांवर गुन्हे दाखल करुन, सदर वेब सिरीजवर बंदी आनण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
तर याप्रकरणी लवकरच एकता कपूरवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती यशस्विनी महिला ब्रिगेडेच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांनी दिली. फिल्म निर्माती एकता कपूर व तीची आई शोभा कपूर यांनी ट्रीपल एक्स सिझन-2 या वेब सिरीजच्या माध्यमातून सैनिक अधिकारी जेव्हा देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरवर लढण्यासाठी जातो.
तेव्हा सैनिक गेल्यानंतर सैनिकांच्या पाठिमागे त्यांची पत्नी बॉयफ्रेंडला घरी बोलावून अनैतिक संबंध स्थापित करते आहे. तसेच नंतर सैनिकी गणवेशही फाडल्याचे आक्षेपार्ह दृश्ये दाखविण्यात आलेली आहेत. देशाचे सैनिक सिमेवर जीवाची बाजी लावून देशवासियांचे रक्षण करतात. आपले कर्तव्य बजावताना अनेक सैनिक देखील शहिद झाले आहेत.
पती सिमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांच्या पत्नी मुला-बाळांचे संगोपण करत असतात. मात्र सैनिकांच्या पत्नीबद्दल ट्रीपल एक्स सिझन-2 मध्ये चुकीच्या गोष्टी दाखवून देशातील सैनिकांचा अपमान करण्यात आलेला असल्याचे यशस्विनी महिला ब्रिगेडेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. वेब सिरीज चालविणार्या फिल्म निर्माती एकता कपूरला देशवासियांनी मोठे केले.
मात्र तीने देशाच्या सैनिकांचा अपमान करुन त्यांची थट्टा केली आहे. तसेच या वेब सिरीजच्या माध्यमातून फक्त सैनिकच नव्हे तर भाऊ- बहिण, सुन-सासरे, मामा-भाची, काका-पुतनी, दीर-वहिणी यांच्या पवित्र नात्यांमध्ये अश्लीलता दाखवून समाजात एक प्रकारे विकृतीवृत्ती पसरवली जात आहे.
हे वेब चॅनल देशाच्या युवा पिढीसाठी घातक असून, त्याच्यावर त्वरीत बंदी घातली पाहिजे व अशा प्रवृत्तीना वेळीच ठेचले पाहिजे. घडलेला प्रकार हा देशभक्त सैनिकांच्या भावनेशी व इज्जतीचा खेळ असून, मी एका सैनिकाची मुलगी असल्याने या प्रकाराबद्दल संताप व निषेध व्यक्त करीत असल्याचे रेखा जरे पाटील यांनी म्हंटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews