लग्नपत्रिका वाटून परतताना झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सख्ख्या भावाच्या लग्नपत्रिका वाटून घरी परतत असताना पिकअपने समोरून मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात नवरदेवाचा भाऊ व मामा अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना दि. २ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास कुर्डू (ता. माढा) हद्दीत झुंडरे वस्तीजवळ घडली. पिकअप चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. नवरदेवाचा भाऊ अभिजित रमेश मोरे (२२, रा. कन्हेरगाव, ता. माढा) व मामा महादेव नामदेव डांगे (६५, रा. पिंपळनेर, डोणवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला.

मृत अभिजित मोरे याच्या सख्ख्या भावाचे दि. १४ रोजी लग्न असल्याने बारलोणी (ता. माढा) येथे पाहुण्यांना पत्रिका देऊन पिंपळनेरकडे निघाले असताना मोटारसायकल (एमएच ४५ डब्ल्यू ९९४३) कुर्डू शिवारातील झुंडरे वस्तीजवळ आली असताना टेंभुर्णीकडून येणाऱ्या पिकअपने (एमएच २४ एबी ६३२५) समोरून जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment