अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हाट्स अॅपवर आक्षेपार्ह मेसेज पाठवून समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी संगमनेर शहरात दोन गट एकमेकांस भिडले. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना बेदम चोपले.
यावेळी जमा झालेल्या कार्यकर्त्यांचा रागाचा पारा एवढा चढला होता कि, यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांची खुमखुमी मिटवण्यासाठी प्राणघातक शस्त्रांचा वापर केला.
यावेळी शहर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या प्रत्येकी पाच जणांवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले असून
पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. याबाबत अधिक माहिती अशी कि, बुधवारी (ता.21) रात्री संशयित आरोपी अमित रहातेकर, धिरज रहातेकर (दोघेही रा.इंदिरानगर), सूरज गाडे व इतर
दोघे अशा पाच जणांनी योगेश सोमनाथ पोगुल (रा.इंदिरानगर) याने त्याच्या मोबाईलवरुन समाज माध्यमात वादग्रस्त स्टेटस् ठेवल्याने
त्याचा जाब विचारीत यातील आरोपी नंबर एक याने हातातील लाकडी दांड्याने फिर्यादीच्या डोक्यावर व चेहर्यावर घाव घालून त्याला जखमी केले.
यावेळी त्याच्या बचावासाठी आलेल्या अन्य लोकांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दमदाटी व शिवीगाळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला.
यातील जखमींवर शहरातील कुटे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अमित सुरेश रहातेकर याने दिलेल्या फिर्यादीतही समाज माध्यमातील स्टेटस्वर ठेवलेल्या वादग्रस्त मजकुरावरुन संशययित आरोपी योगेश पोगुल,
कल्पेश पोगुल, सोनू गोफणे, पोगुल याची आई व पत्नी यांनी लाकडी दांडक्याने डोक्यात व चेहर्यावर प्रहार करीत सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या अन्य लोकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दमदाटी व शिवीगाळ केल्याचे म्हंटले आहे.
यातील जखमींवर शहरातील तांबे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी तक्रारीवरुन शहर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या प्रत्येकी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved