अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी आहे. त्यांनी दिलेले संस्कार, परंपरा व विचार दिवसेंदिवस लोप पावत चालले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मनुष्य या गोष्टींपासून दूर होत चालला आहे.
लग्न सोहळा दिवसेंदिवस मोठ्या थाटामाटात करण्याची प्रथा वाढत गेली आहे. परंतु नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील रावसाहेब ज्ञानदेव जाधव यांनी आपल्या मुलाचा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पाडला.
बैलगाडीतून नवरदेवाचा परण्या काढण्यात आला. कोरोना संसर्गाच्या काळात शासनाच्या सर्व अटी शतींचे पालन करुन हा विवाह सोहळा पार पाडला. रावसाहेब ज्ञादेव जाधव यांचे चि. वैभव जाधव, रा. देऊळगाव सिद्धी व वाळकी येथील राजेंद्र बोठे यांची कन्या चि.सौ.कां.निकिता बोठे यांचा शुभविवाह पारंपरिक पद्धतीने पार पाडला.
यावेळी आ. संग्राम जगताप, आ. निलेश लंके, बाजार समितीचे माजी सभापती विलासराव शिंदे, दादाभाऊ चितळकर, दादा बोठे, आजिनाथ सरगर, गोरख इंगळे, निवृत्ती गिरवले, भरत पवार, बाळासाहेब कोठुळे, संभाजी कासार, पंडित अण्णा बोठे आदी उपस्थित होते.
यावेळी पारंपरिक पद्धतीने जोडली विवाहाची गाठ. बैलगाडीतून वऱ्हाड येऊन जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तसेच मोजक्याच पाहुण्यामंडळीत लग्न लावले.
कोरोनाच्या काळात प्रतिबंधामुळे अनेक गोष्टीना मर्यादा आली. मात्र यातून नवे वळण देखील अनेक गोष्टींना मिळत आहे. मोजक्या नातलगांच्या साक्षीने व पुरोहितांच्या अशिर वचनाने शुभमंगल सावधान झाले.
यावेळी कोरोना संसर्ग विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये, याची पुर्णत: दक्षता घेण्यात आली. मोजक्या पाहुण्या मंडळींमध्ये सॅनिटायझर, मास्क यांचे सक्तीने वापर करण्यात आले. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालनही सक्तीचे केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews