अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- पवार कुटुंबीय सभ्य, सुसंस्कृत आहे. मात्र टप्प्यात आल्यावर ते कार्यक्रमही करतात, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी खासदार निलेश राणे यांना इशारा दिला आहे.
तनपुरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, ‘पवार कुटुंब सभ्य आहे. ते अभ्यासू तर आहेत. परंतु सुसंस्कृतही आहेत. मात्र, टप्प्यात आले तर कार्यक्रमही करतात.’
माजी खासदार नीलेश राणे यांनी केलेल्या टीकेला रोहित पवार यांनी सभ्य भाषेत उत्तर दिले होते. खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे चुकीचे असल्याचेही तनपुरे म्हणाले.
माजी खासदार नीलेश राणे आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यात सध्या ट्विटयुद्ध सुरू आहे. रोहित पवार यांच्यावर राणे यांनी एकेरीवर येत टीका केली होती.
मात्र, रोहित यांनी त्यांना आपल्या स्टाईलने उत्तर दिले होते. हे ट्विटयुद्ध सुरू असतानाच राष्ट्रवादीचे युवा मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यांनीही पवारांची बाजू घेतली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com