देशाचा पंतप्रधान हा निधड्या छातीचा हवा – आदित्य ठाकरे

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव :- देशाचा पंतप्रधान हा निधड्या छातीचा हवा. देशाचे संरक्षण करण्यासाठी सक्षम निर्णय घेणारा हवा. त्यासाठी नरेंद्र मोदी हेच योग्य आहेत.

कारण ते कणखर नेतृत्व आहे. पंतप्रधान मोदी व राहुल गांधींची तुलना होऊच शकत नाही. काँग्रेस आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही.

ही निवडणूक गल्लीची नसून दिल्लीची आहे, हे लक्षात ठेवा, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

शिर्डी मतदारसंघातील सेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी आंबेडकर मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते.

या वेळी आमदार स्नेहलता कोल्हे, नरेंद्र दराडे, संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, रावसाहेब खेवरे,

राजेंद्र झावरे, प्रमोद लबडे, कैलास जाधव, विवेक कोल्हे, सुहास वहाडणे, सचिन तांबे, शरद थोरात, सुनील तिवारी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment