अहमदनगर लाईव्ह24 टीम :- तब्बल २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे थांबलेली रेल्वेसेवा १५ एप्रिलपासून सुरू होणार असल्याची माहिती समोर येत असताना रेल्वेकडून वरील स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
रेल्वे बोर्डाकडून प्रत्येक रेल्वेला मंजुरी मिळल्यानंतरच रेल्वेसेवा पूर्ववत सुरू केली जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांसोबत शुक्रवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने हिरवा कंदील दाखविल्यानंतरच रेल्वेसेवा सुरू केल्या जातील. या मुद्द्यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने मंर्त्यांची एक समिती स्थापन केलेली आहे. सर्व १७ झोनमधील डब्यांच्या उपलब्धतेनुसार रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत योजना बनवली जात आहे.
रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतर सर्व प्रवाशांची थर्मल तपासणीदेखील केली जनायाची शक्यता आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com